
🔴 हावगी पन्नासे यांना राज्यस्तरीय श्री पंचाक्षर सेवारत्न पुरस्कार प्रदान.
शिवगर्जना न्यूज,
नायगाव तालुका प्रतिनिधी
कौठा येथील हावगी पन्नासे यांना राज्यस्तरीय श्री पंचाक्षर सेवारत्न पुरस्कार प्रदान. करन्यात आला आहे. श्री सद्गुरू दमया स्वामी जंगममठ संस्थान संचालित, महातपस्वी श्री ष.ब्र.१०८ सद्गुरु पंचाक्षर शिवाचार्य महाराज यांच्या ११८ व्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, अकोला येथे श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्रीश्रीश्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी यांच्या उपस्थितीत व दिव्य सानिध्यात ज्ञानतपोरत्न श्री ष.ब्र.१०८ सद्गुरु डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज श्रीक्षेत्रमन्मथधाम यांच्या वतीने निवड करून व धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, संगीत क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कौठा ता.कंधार जि.नांदेड येथील तथा महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात या राज्यातील सुप्रसिद्ध नामवंत गायक स्वरशिरोमणी श्री हावगी उत्तमराव पन्नासे यांना ‘राज्यस्तरीय वीरशैव श्री पंचाक्षर सेवारत्न पुरस्कार-२०२५’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, रुद्राक्ष माळ देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र मन्मथधाम, बाळापुर, श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू सोमलींग शिवाचार्य महाराज बिचकुंदा,श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा,श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत,श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा,श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरू श्रीकंठ शिवाचार्य महाराज नागणसुर,श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू निलकंठ शिवाचार्य महाराज महिदर्गी, श्री ष.ब्र.१०८ सद्गुरू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगळी व प्रमुख मान्यवर परिसरातील सर्व भाविक-भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)
















