14.3 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठी अभिजात भाषा अभिमान सोहळा संपन्न.

🔴 मराठी अभिजात भाषा अभिमान सोहळा संपन्न.                                               

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : 

देगलूर अडीच हजार वर्षाहून अधिक जुना इतिहास लाभलेली व विविध संप्रदायातील संतांनी व आधुनिक काळातील प्रज्ञावंतांनी श्रीमंत शब्द सौंदर्य असलेल्या मराठी भाषेच्या वैभवात अधिकच मोलाची भर टाकली. शब्द संपत्तीच्या दृष्टीने जगातील एक समृद्ध भाषा असलेल्या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून तमाम मराठी भाषिकांचे स्वप्न पूर्ण केले. मराठी भाषा व जगातील मराठी भाषिकांचा यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवच केला आहे. याच निमित्ताने आभार व त्या संबंधित कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री समर्थ वाचनालय देगलूर व अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळा- २०२५ ” या कार्यक्रमात प्रा. डॉ.रवींद्र बेम्बरे ( देगलूर-बिलोली विधानसभा प्रभारी, अभिजात मराठी भाषा सन्मान अभियान ) यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देगलूर-बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापुरकर हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान करून मराठी भाषेला जागतिक स्तरावर मोठाच सन्मान मिळवून दिला, त्याबद्दल पंतप्रधानांचे सकल मराठी भाषिक कृतज्ञ आहेत. प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान व आत्मीयता बाळगली पाहिजे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी केले. स्थानिक कवी लक्ष्मण मलगिरवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बालकवी शं.ल. नाईक, लक्ष्मण मलगिरवार, अनिल पवार, पांडुरंग पुठे्ठवार, ऋषिकेश देशमुख, महेश कुडलीकर माधव, मोखाडे, कवी हिवराळे आदी साहित्यिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास कार्यवाह अविनाश हसनाळकर, सूर्यकांत नारलावार, देवेंद्र मोतेवार, प्रा. कत्तूरवार, नंदकुमार दाशेटवार, प्रा.आनंद वळंकिकर, प्रकाश चिंतावार, शांताराम पळणीटकर, एस. एल. देशमुख, अशोक गंदपवार, ग्रंथपाल पुंडलिक कदम, भावना दाशेटवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बा.रा. कत्तुरवार तर आभार प्रा.महेश कुडलीकर यांनी मानले. 

श्री समर्थ वाचनालय वतीने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५ उपक्रमांतर्गत” शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शन, सामूहिक वाचन, निबंध स्पर्धा, परिसंवाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या