25.9 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️भाजपा सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात.

🔴 आ राजेश पवार यांच्या नेतृत्वात पूनमताई पवार यांच्या पुढाकाराने भाजपा सदस्य नोंदणी अभियानास नायगाव विधानसभे सह  जिल्ह्यात सुरुवात.

शिवगर्जना न्यूज,

नायगाव : तालुका प्रतिनिधी 

परमेश्वर जाधव 9890008821

संघटन पर्व विकसित भारत घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वात वाटचाल करत आहे. याच वाटचालीचा एक भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नायगाव विधानसभा मा. आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वात व पुढाकारणे ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याचे ध्येय आपण सर्वांनी बाळगले आहे. ध्येय साकार करायचे असेल तर भारतीय जनता पार्टी हाच एकमेव मार्ग आहे. ही बाब लक्षात घेत अनेक सामाजिक कार्यकर्ते भाजपा परिवारात प्रवेश करत आहेत. आपण सर्वांनी ही भाजपचे सदस्यत्व स्वीकारून देश सेवेच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण महिला जिल्हा अध्यक्ष पुनम ताई पवार यांनी केले आहे.

भाजपचे सदस्य होण्यासाठी ८८ ०० ०० २०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल. या मेसेज मधील लिंकवर क्लिक करा. त्यानंतर येणाऱ्या फॉर्म मध्ये आपली सर्व माहिती भरावे. त्यानंतर आपल्याला आपले भाजपा सदस्यत्वाचे ओळखपत्र दिसेल. हे ओळख पत्र आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही देश हिताच्या कामात सामील करून घ्यावे. सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांना विनंती करण्यातत येते की, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशांनी ठरवून दिल्या प्रमाणे आज दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सदस्य नोंदणी विशेष अभियान पर्व दिवस म्हणून राबवायचा असल्याकारणाने, आपण आपल्या बूथ वर आजच्या दिवसात किमान ५० तरी सदस्य नोंदणी करावी व त्याची नोंद आपल्याकडे लिहून ठेवावे असे आव्हान नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण महिला जिल्हाध्यक्ष सौ.पूनमताई पवार यांनी केले आहे. पूनमताई स्वतःच्या बूथवर अल्लूवडगाव या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून सदस्य नोंदणी अभियान उपक्रम राबवले आहेत. तरी आपण पण हे अभियान गांभीर्याने घेत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावे असे आव्हान त्याच्या तर्फे सर्व बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या