🔴ग्राहक पंचायत देगलुर तालुका कार्यकारिणी जाहीर.
◼️अध्यक्ष पदी देगलूरकर तर संतोष शिंदे सचिव पदी.
शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी
देगलूर : महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रमा अंतर्गत येणाऱ्या ग्राहक पंचायत देगलूर तालुका कार्यकारणींच्या सदस्यांची बैठक नुकतीच येथील विश्रामगृहात घेण्यात आली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ग्राहक व विक्रेता यामध्ये सुसंवाद साधून ग्राहकावर अन्याय होणार नाही या संदर्भात ही कार्यकारणी दक्ष राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी सुभाष गंगाधर आप्पा देगलूरकर तर सचिव पदी संतोष रामराव शिंदे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संघटक पदी प्रा. डॉ. रवींद्र बेंबंरे, सहससंघटक म्हणून विस्तार अधिकारी हमीद दौलताबादी, सहसचिव पदी प्रा. डॉ. आनंद वळंकीकर, कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर लगडे, कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. कृष्णा जोशी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून पत्रकार अनिल कदम तर मार्गदर्शक म्हणून रावसाहेब चाकूरकर यांची निवड करण्यात आली. या वेळी इतर सदस्यात शंकरराव रायकोडे, वैजनाथ स्वामी, सायलु यादव तर महिला प्रतिनिधी म्हणून भार्गवी दीक्षित, अनुसया देगलूरकर यांची निवड करण्यात आली. येत्या ता. ८ जानेवारी रोजी येथील तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात येणार असून त्या संदर्भात व्यापारी व ग्राहकांना या कार्यक्रमाला बोलावून ग्राहक दिनाच्या अनुषंगाने व्यापारी व ग्राहक यामध्ये सुसंवाद राहण्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले जाणार असल्याचे पद सिद्ध सचिव तथा तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सांगितले.
◼️देगलूर येथील ग्राहक पंचायत ची नवीन तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शिवगर्जना न्यूज संपादक : श्री शहाजी वरखिंडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 🗣📲📞(9923072242)