16.6 C
New York
Friday, May 8, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी शेख असलम

🔴 पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी शेख असलम

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर ता. प्रतिनिधी

देगलूर : पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचने नुसार जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्ष पदी युवा पत्रकार शेख असलम यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली.

पत्रकार संरक्षण समिती संपूर्ण राज्यात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढा देत असून नांदेड जिल्ह्यात सुध्दा पत्रकार संरक्षण समितीचे मोठे कार्य आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडी अडचणी सोडविण्याचे काम पत्रकार संरक्षण समिती करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात समितीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली असून, देगलूर येथील युवा पत्रकार शेख असलम यांची देगलूर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नामदेव कांबळे, पत्रकार कुलदीप सूर्यवंशी, पत्रकार रियाज अत्तार, यांची उपस्थिती होती. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आशिष देशपांडे, जिल्हा सहसचिव शेख रफिक यांच्यासह अनेकांनी शेख असलम यांच्या निवडीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या