25 C
New York
Friday, June 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

♦️विद्यार्थ्यांना मेहनती शिवाय पर्याय नाही — पोलीस निरीक्षक मारुती मुंडे

🔴 विद्यार्थ्यांना मेहनती शिवाय पर्याय नाही — पोलीस निरीक्षक मारुती मुंडे. 

▪️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम. 

शिवगर्जना न्यूज, 

देगलूर प्रतिनिधी : (9923072242) 

देगलूर: आजच्या स्पर्धेच्या युगात सोप्या पद्धतीचा मार्ग न अवलंबता विद्यार्थ्यांनी शिक्षणात कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात मेहनती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन देगलूर पोलीस स्टे. निरीक्षक मारुती मुंडे यांनी केले.

ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यानात दि २५ बुधवार रोजी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ होते.

प्रारंभी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने इ.अकरावी, बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती प्रा.डॉ.धनराज लझडे यांनी प्रास्ताविकातून करून दिली.

मा.मुंडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना संस्कार क्षम शिक्षणाची आवश्यकता आहे. सोशल मीडियाचा वापर स्पर्धा परीक्षा अभ्यासाकरीता विद्यार्थ्यांनी जरूर केला पाहिजे. प्रत्येक येणारी माहिती स्क्रीनवर न वाचता ती प्रिंट काढून वाचावी आणि आपल्याकडे जतन करून ठेवण्याची सवय लावावी असा सल्ला दिला.

आपले स्वास्थ चांगले तर अभ्यासही चांगला इतर कामातही मन लागते यासाठी शरीर स्वास्थ तंदुरुस्त ठेवण्यासाठी सातत्याने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. असे सांगत त्यांनी राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देऊन आपण पहिल्या दहा मध्ये कसे आलो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जीवनात गुरु, आई, वडील यांचा आदर करावा. निर्व्यसनी रहावे. स्पर्धा परीक्षा अभ्यासा करिता पहिली पासूनचे नोट्स, पुस्तकं आपल्याकडे जतन करून ठेवली पाहिजेत. देगलूर महाविद्यालय हे इ.अकरावी, बारावी पासूनच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करीत आहे याविषयी गौरवोद्गार काढले.

उप प्राचार्य प्रा.उत्तमकुमार कांबळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राच्या उपक्रमाचा ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना कसा फायदा होत आहे याची माहिती आपल्या मनोगतात दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी स्पर्धा परीक्षेसाठी उपक्रमशील यशस्वी अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन अभ्यास केला पाहिजे असे मत मांडले.

यावेळी वरीष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, स्पर्धा परीक्षा समितीचे सर्व सदस्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश कुलकर्णी तर आभार पर्यवेक्षक प्रा.एस. एन.पाटील यांनी मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या