
🔴”पुस्तक प्रकाशन” सोहळा व “बहु भाषिक काव्य मैफिल” संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
पूणे प्रतिनिधी : जगदीप वनशीव
पुणे -हडपसर येथील “प्रयास” हिंदी, उर्दू , मराठी साहित्य अकादमी, पुणे पुस्तक प्रकाशन सोहळा व काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा.उध्दव महाजन “बिस्मिल” यांनी केले डॉ नजीर फतेहपुरी यांचा कथासंग्रह “उजाले की तरफ” पुस्तकावर आधारित सविस्तर माहिती दिली.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉ नज़ीर फतेहपुरी, डॉ अजीम राही, प्रयासचे उपाध्यक्ष, अब्दुल हमीद “हुनर” प्रयासचे महासचिव प्रा.उध्दव महाजन, फारूक शमीम, शबाना अरब दिवंगत शमशाद ताकीदार यांची बहीण अफरोज ताकीदार, दिवंगत शमशाद ताकीदार यांचे सुपुत्र व स्नुषा, शिवाजी उराडे अध्यक्ष प्रयास, नानाभाऊ माळी या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ नजीर फतेहपुरी लिखित “उजाले की तरफ “या उर्दू कथासंग्रहाचे व दिवंगत शमशाद ताकीदार यांच्या “रोशनी की नई किरण” या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा पहिल्या सत्रात संपन्न झाला.
दुसऱ्या सत्रा मध्ये “बहुभाषिक निमंत्रित” कवींच्या कवि संमेलन अध्यक्ष पदी जेष्ठ गझलकार अरूण कटारे, प्रमुख पाहुणे गायक लेखक कवी राम सर्वगोड प्रा. उध्दव महाजन हे उपस्थित होते. जनाबापू पुणेकर, महेंद्र माणिक, इंदिरा पुनावाला भावना गुप्ता, चंद्रशेखर सराफ, विद्या सराफ, कविता काळे, कांचन मून, कांचन पाडळकर, डॉ मिलिंद शेंडे, छगन वाघचौरे, शिवाजी उराडे, जांबुवंत ओहोळे, प्रमोद निगडे, डॉ नमिता आर्य, विनोद अष्टुळ, डॉ प्रेरणा उबाळे, डॉ अनिल बागवान, नरेंद्र कुंवर छाबडा, डॉ नरेश शर्मा, वेदस्मृती कृती, डॉ ज्योती कृष्ण, सतिश कुलकर्णी, नंदकुमार मिश्र, या मान्यवरांनी गझल, लावणी, गवळण, अष्टाक्षरी, समाज प्रबोधन, शेरो शायरी, विनोद, हास्य कल्लोळ करत काव्य मैफिली ची रंगत वाढवली काव्य मैफिलीचे सूत्र संचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी त्यांच्या शीघ्र चारोळ्यातून रसाळ वाणीतून गोडवा निर्माण करत मैफिल रंगतदार बहारदार, दमदार आवाजात सूत्रसंचालन हटके शैलीत केले.
अध्यक्षीय भाषणात गझलकार अरूण कटारे म्हणाले कवीने भाषण करू नये मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे मी कवितेतूनच माझे मत मी नेहमी मांडत असतो “बहुभाषिक निमंत्रित” कवींच्या काव्य मैफिलाचा अध्यक्ष केल्याबद्दल मी “प्रयास” संस्थेच्या मी ऋणात राहू इच्छितो दोन गझल सादर करत रसिकांची मने जिंकली आभार प्रदर्शन नानाभाऊ माळी यांनी केले.
राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला महात्मा फुले कला निकेतनचे ज्ञान प्रबोधिनी विद्यालय ससाणेनगर हडपसर, पुणे या सभागृहात कार्यक्रम पार पडला.















