🔴 जनता विद्यालय पंचक शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव
नाशिक रोड आज दिनांक ०५/०९/२०२४ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शना खाली व समिती चे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोराडे यांच्या अध्यक्षते खाली मनपा शाळा क्र.४९ व जनता विद्यालय पंचक येथे ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती कडून गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तद प्रसंगी उपस्थित शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे पदाधिकारी प्रकाश बोराडे जिल्हा अध्यक्ष व रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष व इतरही मान्यवर उपस्थित होते.