🔴 डाॅ.साहेबराव निकम राष्ट्रीय मार्गदर्शक, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. श्याम जाधव
नाशिक – दिनांक ०५/०९/२०२४ रोजी बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील अकाउंटन्सी विभाग प्रमुख व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ऐक्य पुरस्कार प्राप्त डॉ.साहेबराव दौलत निकम यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देत असलेल्या भरीव योगदाना साठी ५ सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त मुंबई नाका येथील श्री कालिका देवी ट्रस्ट यांच्यावतीने ‘राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक’ पुरस्कार २०२४ नाशिक चे पोलीस उपायुक्त मा.श्री चव्हाण यांच्या हस्ते मा. अण्णासाहेब पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. डॉ.साहेबराव निकम यांचे महाविद्यालया च्या प्राचार्य प्रोफेसर डॉ.मंजुषा कुलकर्णी, डॉ.अनिल कुमार पठारे, डॉ. के.सी. टकले, डॉ.आकाश ठाकूर आणि इतर सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे भरभरून अभिनंदन करून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या .
तसेच केंद्र सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादासाहेब केदारे, माजी न्यायाधीश मा. अशोक आव्हाड, सौ. रोहिणी जाधव, डॉ.अविनाश झोटिंग, हेमंत कुलकर्णी, सौ.सविता खैरनार, सौ.जयश्री बस्ते, सौ.यौजना भगत, श्री.शरद लोखंडे, ॲड.रघुनाथ कुशवाह आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.