🔴 देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा व अतिवृष्टीमुळे आर्थिक मदत देण्यात यावे.
शिवगर्जना न्यूज
देगलूर प्रतिनिधी : (९९२३०७२२४२)
देगलूर तालुक्यातील २०२३ वर्षांतील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावे. व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावे या मागणी निवेदन शिवसेना उप जिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. उप जिल्हाधिकारी अनुप पाटील व तहसीलदार सुर्यवंशी यांच्या मार्फत शासनास देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक नागनाथ वाडेकर, बिलोली तालुका संघटक व्यंकट गुज्जरवाड, देगलूर शिवसेना तालुका संघटक शांतेश्वर पाटील शेवाळकर, बिलोली युवा सेना उप तालुका प्रमुख प्रशांत वानोळे, शहापूर सर्कल प्रमुख रवी पाटील, शेवाळा शाखा प्रमुख राम पाटील, खानापूर विभाग प्रमुख राजेंद्र उल्लेवार, शिवसेना तालुका सचिव शिवाजी मुजळगेकर आदी सह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.