🔴 शिक्षक दिनानिमित्त पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने आदर्श पुरस्काराने सन्मानित.
शिवगर्जना न्यूज,
नायगांव ग्रा. तालुका प्रतिनिधी
दिपक गजभारे
बरबडा :- पाटोदा येथील सह शिक्षक राहुल भद्रे यांना ग्रामिण भागातील जिल्हा परिषद मराठी माध्यम शाळा येथील विद्यार्थी उत्तम प्रकारे घडवून मुलांना इंग्रजी चे धडे देत इंग्लिश मिडीयम शाळेस लाजवेल असे येथील विद्यार्थी घडत एकदम परफेक्ट इंग्लिश बोलायला मुलांना शिकवून राज्यभरात या शाळेचे नाव उज्वल करण्यात भद्रे यांचा मोलाचा वाटा आहे. एका ग्रामिण भागातील मुले घडविण्याचा उपक्रम राबविणारे भद्रे तसेच त्यांना सहकार्य करणारे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या माध्यमातून आपले व आपल्या विद्यार्थ्यांचे नाव मोठया शिखरावर नेण्याचे कार्य एका शिक्षकांचे असते त्याच अनुषंगाने भद्रे हे कार्य करीत असल्याने गावाकऱ्याच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षक दिनी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा व शालेय समिती पाटोदा यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या शैक्षणिक उपक्रमात सतत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना घडविणे, स्पर्धा परीक्षा आयोजित करणे, महा पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून मुलांना भाषणाची गोडी निर्माण करणे अशा अनेक उपक्रमामुळे हि नावाजलेली आहे. या शाळेला अधिकारी भेटी देऊन त्यांच्या बद्दल गौरव, उद्गार काढून प्रोत्साहन देत असतात.
या शाळेला जिल्हा परिषद नांदेड चे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, अशोक काकडे, वर्षाताई ठाकुर, उप शिक्षणाधिकारी सविता बिरगे, नायगाव विधान सभा आमदार राजेश पवार, प्राचार्य डॉ. आंबेकर, डॉ. जयश्री आठवले या सहित अनेक पदाधिकारी व राजकीय मंडळींनी भेटी देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे.
◼️आजवर भद्रे यांना ग्रामपंचायत मुर्शदापुर ता. लोहारा आदर्श पुरस्कार, नायगाव तालुका आदर्श पुरस्कार, पाटोदा ग्रामस्थ सर्वोच्चत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार, माणुसकी सेवाभावी संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, या सहित अनेक पुरस्काराने गौरव सन्मानित करण्यात आले आहे.