🔴 धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तात्काळ नुसकान भरपाई भेटण्यात बाबत निवेदनाद्वारे केली मागणी — निळकंठ पाटील जाधव
शिवगर्जना न्यूज,
नायगाव तालुका प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सर सकट हेक्टरी ५०,००० (पन्नास हजार) रुपये शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यास संलग्न असलेल्या बँक खात्या मध्ये जमा करण्याची मागणी, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे नांदेड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख निळकंठ पाटील जाधव यांनी केली. या बाबत चे निवेदन नायगाव तहसील कार्यालय व नायगाव कृषी कार्यालय येथे देण्यात आले. आहे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार व अतिवृष्टी सदृष्य धो धो पाऊस पडत असून १ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अहवाल प्राप्ती नुसार नायगाव तालुक्यातील महसुली मंडळा मध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हा माहिती व प्रसारण च्या माध्यमातून चित्र फितीद्वारे नोंदविण्यात आले आहे. सदरचा अहवाल सार्वजनिक केला असून उर्वरित बारा तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात घरे, गाई, गोठे, पशु धनाची जीवित हानी झाली असून नायगाव तालुक्या मधील महसूली मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत पंचनामे करण्यास आदेशित करून सोयाबीन, कापूस, तुर, ज्वारी, उडीद यांचे नूकसान तर काही ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले असून पीक नुकसानी सह इतर सर्व नुकसानी ची भरपाई देण्यात यावी. तथापी विना विलंब सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हेक्टरी ५०,००० /- हजार मोबदला थेट बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यात यावा. अशी मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने देविदास पाटील वडजे, गजू पाटील हिप्परगेकर, राजेश जाधव खैरगावकर, शिवाजी पाटील सातेगावकर, समाजवादी पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी, परेश पाटील मोकासदरा, नांदेड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख निळकंठ पाटील जाधव यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. मागणी पूर्ण नाही झाल्यास तहसील कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने नायगाव तहसील कार्यालय व कृषी विभाग कार्यालय नायगाव येथे निवेदन देण्यात आले.