🔴 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या निषेधार्थ तथागत ग्रुप आक्रमक.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
सांगली मेहकर- मेहकर येथील तहसील कार्यालय येथे मा.पिंपरकर साहेब नायब तहसीदार यांच्या मार्फत, मा.एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई तसेच रा. काँ . पार्टी बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवी मिस्किन व रा. काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे मेहकर तालुक्याचे जेष्ठ नेते आफ्ताबजी खान यांच्या नेतृत्वाखाली मेहकर येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सदर घटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या घटनेचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व रा. काँग्रेस पार्टी शरद पवार वतिने तीव्र जाहीर निषेध व्यक्य करत आहे. यामध्ये ज्या – ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनीयर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची सखोल चौकशी करावी. या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण यामध्ये सामील आहेत. त्यांची ही सखोल चौकशी झाली पाहिजे. हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाईगडबडीने राजकारणा च्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे भ्रष्टाचारी शाळा, महाविद्यालय, हॉस्पीटल, रस्ते, उड्डाणपूल, या कामात ही भ्रष्टाचार करतात परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मध्ये सुद्धा भ्रष्टाचार करणे सोडले नाही तर काही महाभाग असे आहेत ४०-४० वर्ष किल्ल्याची आठवण येत नाही किती दुर्दैव आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात त्याच शिवाजी राजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळणं म्हणजे हा महाराष्ट्र कोसळला आहे. पावणे चारशे वर्षांपासून छत्रपतीं नी निर्माण केलेला एकही किल्ला कोसळला नाही. छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला तो सुद्धा १२६ वर्षे झाले तरी सुद्धा धक्का नाही मग हा पुतळा आठ महिन्यात कसा काय कोसळला. यामध्ये कोण कोणते मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल चौकशी झाली पाहिजे आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतिने करण्यात येत आहे. यावेळी, तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, आफ्ताबजी खान, रवी मिस्कीन, कुणाल माने, दुर्गादास, राधेशाम खरात, अख्तर कुरेशी, प्रकाश सुखधाने, राम डोंगरदिवे, आरिफ शहा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.