🔴 नायगांव विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करा — बालाजी बच्चेवार.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधि : निळकंठ जाधव
नांदेड जिल्ह्यातील नायगांव विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीची तातडीने पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करन्याचे आदेश शासन स्तरावर नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री या नात्याने तातडीने आदेश देऊन जिल्हा प्रशासना मार्फत नायगाव मतदार संघातील शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी भाजप नेते बालाजी बच्चेवार यानी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, नायगांव विधानसभा मतदार संघात व नांदेड जिल्ह्यात गत दोन-तिन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असून याबाबत आपल्यास्तरावरुन मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांना उपाययोजना करण्यासाठी पालक मंत्री यांनी आदेशीत करावे. व गत दोन ते तिन दिवसांपासून
नांदेड जिल्ह्यात मूख्यत्वे नायगांव विधानसभा मतदारसंघात संततधार पाऊस सुरु आहे. परंतू जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी पर्जन्यमान कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. गत काही वर्षातील परिस्थिती पहाता अत्यल्प पावसातही या मतदारसंघातील नायगांव (खै.),धर्माबाद व उमरी या तिन्ही तालुक्यातील नद्या, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पुर आलेले आहेत. तसेच शेती पिकांसह पशू ची पण मोठी हानी झालेली आहे. येथील दळण वळण व दैनंदिन जीवन ठप्प झालेले आहेत. आज शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण बैलपोळा असून प्रशासनाने त्यादृष्टीने योग्यतेने उपाययोजना केलेल्या नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गत कांही वर्षापासून व यंदाही नैसर्गिक आपत्तीत येथिल शेतकरी त्रस्त बनला आहे. त्यांच्या सह येथिल जनतेला दिलासा देण्यासाठी आपण तातडीने स्वतः लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.
मे.साहेबांनी याप्रकरणी स्वतः लक्ष देऊन माझ्या नायगांव विधानसभा मतदार संघातील सद्यास्थित नैसर्गिक परिस्थितीचा वेळो वेळी आढावा घेण्यासह संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाय योजना करण्या सह येथिल नैसर्गिक आपत्तीची पहाणी करून पंचनामे करुन आपत्ती ग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे आदेश आपल्या स्तरावरुन देवून आश्र्वासित करण्याची मागणी पालक मंत्री व जिल्हा प्रशासना कडे केली आहे.