🔴शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
नाशिक आज दि.०२/०९/२०२४ रोजी जिल्हा परिषद भवन नाशिक शिक्षणाधिकारी डॉ.नितिन बच्छाव यांच्याशी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस यांना कामावरून कमी करणे बाबत व इतर मागण्या मान्य करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
चर्चे मध्ये गट शिक्षणाधिकारी/अधिकारी वर्ग. २ पीएम पोषण पंचायत समिती दिंडोरी, गट शिक्षणाधिकारी अधिकारी वर्ग २ पंचायत समिती निफाड, गट शिक्षणाधिकारी अधिकारी वर्ग २ पंचायत समिती पेठ या समीत्यांना शाळेवर जाऊन ८ ते १० दिवसांच्या आत अहवाल मागविला आहे. तसेच या पुढे कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करण्यात आल्या वर शासन निर्णय क्.शा पोआ २०२२ प्र क् १३०एस.डी.३ दि १८डिसेंबर २०२४ कार्यालयांचे पत्र शिक्षण प्राथमिक शा.पो.आ. ५८३ते ६००/२४ दि.२३ऑगस्ट २०२४ अन्वये निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्तुत योजने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामकाजा बाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्या वर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. तद्नंतर या बाबत गट शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. असे निर्देश देण्यात आले. शालेय पोषण आहार धान्याची गाडी शाळे पर्यंत येत नाही तर ते धान्य डोक्यावर घेऊन जात असेल तर त्यांना त्यांच्यी मजुरी देण्यात येईल. ही बातमी चिंचला खैरे, जुनवणे, कामडवाडी या शाळेची दखल घेतली आहे.
इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी साठी तुम्ही संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार पुणे व मंत्रालय येथे पाठ पुरावा करावा. या महिन्यात गणपती बसण्याच्या पहिले मानधन देण्यात येईल असे लेखाधिकारी श्री. विजय मोरे चर्चा करण्यात आली आहे. तसेच जे कर्मचारी पट संख्ये वरून कमी करण्यात आले आहे त्यांना पट संख्या वाढल्यावर पहिलें प्राधान्य देण्यात येईल. आज संघटना पदाधिकारी यांच्या जोडीला इगतपुरी तालुक्यातील शिक्षणाधिकारी पंचायत समिती इगतपुरी सोनावणे हजर होते.
उपस्थित शा.पो.आ. संस्थापिका निता ताई वारघडे, शालू ताई हंबीर संतोष भाऊ भगत,बाळू भाऊ गांवडा, बबन भाऊ हंबीर हे उपस्थित होते.