🔴 भरवीर खुर्द भैरवनाथ मुखवटा वाजत गाजत मिरवणूक यात्रा संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
इगतपुरी प्रतिनिधी : भास्कर सारुकते
इगतपुरी,भरवीर खुर्द : आज दि. ३१ रोजी भैरवनाथ मुखवटा गावांमधून मिरवणूक काढण्याची परंपरा चालू ठेवणारे भरवीर खुर्द व परंपरे प्रमाणे आजही चालू आहे गावातील मोठ्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीचे आयोजन दुपारी ३ ते ५ दरम्यान संपूर्ण भरवीर खुर्द गावातून आनंदाने व मोठ्या उत्साहाने मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
गुरुवर्य श्री परसराम बांडे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजन करण्यात आले होते भरवीर खुर्द वाघे मुरूळी तानाजी बांडे, भाऊसाहेब बांडे, शंकर दवंडे, राजू पुंडे, काशिनाथ बांडे, काका बांडे, बाबुराव बांडे व सावळीराम बेंडकोळी तसेच गावातील गावकरी महिला मंडळ नाना पांडे, रामदास टोचे, सोमनाथ टोचे, निवृत्ती कोकणे, गोपाळा चौरे, बाळू शिंदे, अशोक तात्या शिंदे, विकास कोकणे व शिवाजी काजळे तसेच पंचक्रोशीतील गायन पार्टी त्यांनाही त्यांच्या कला दाखवण्याची गायनाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजन करण्यात आले तसेच गावातील पोलीस पाटील रमेश टोचे व सरपंच रामभाऊ सारुकते तसेच वाघे मुरूळी शहापूर, पिंपळगाव बसवंत, नाशिक, चांदवड, राजुर अकोले व त्र्यंबकेश्वर सर्व पंचक्रोशीतील वाघे मुरुळी व कलावंत कलाकार यांनी गावाची शोभा वाढवली तसेच भास्कर सारुकते, जगन शिंदे, रामभाऊ सारुकते बापू टोचे कार्यक्रमास हजेरी लावली तसेच गावकऱ्यांनी भोजन दानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला व गावातील आदिवासी कार्यकर्ते कार्यक्रमाचे सूत्रधार नवनाथ बांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भैरवनाथाच्या मुखवटा मिरवणुकीत अबाल वृद्ध, तरुण महिला यांचा मोठा सहभाग झाला होता ह्या मुखवट्या मिरवणुकीची भरवीर खुर्द गावचे कायापालट होणार असे वाटत होते ही यात्रा स्वरूप असून प्रत्येक वर्षी गावकरी मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात ही गावची परंपरा असून हे दैवत नवसाला पावणारे भैरवनाथाचे होय.