🔴 मानार प्रकल्प बारुळ या धरणाचे पाणी उदगीर व जळकोट शहरासाठी पाणी पुरवठयासाठी जाणाऱ्या पाईप लाईन कामास तात्काळ स्थगिती द्या.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : निळकंठ जाधव
नांदेड जिल्ह्यातील नायगाव, बिलोली तालुक्यातील सर्व शेतकरी माय-बाप यांना विनंती आहे. बारुळ धरणातून उदगीर व जळकोट या गावासह लातुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाईप लाईन बारुळ धरणातील पाणी उदगीर व जळकोट जाणारे पाणी तात्काळ थांबविण्यात यावे पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनचे काम चालू आहे. मा.जिल्हाधिकारी व जलसंपदा मंत्री सह संबंधित सर्वांकडे कार्यवाही करून या कामास तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
बारुळ येथील मानार प्रकल्पाच्या या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा खुपच कमी झाला. व प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस लिंबोटी धरण निर्माण झाले असल्यामुळे धरणात येणारे पाणी पुर्वी पेक्षा कमी झाले आहे, त्या परिणामी प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र घटले गेले.
नायगाव, बिलोली तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावाचे वाळवंट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या अगोदर च्या उन्हाळ्या मध्ये आणि भविष्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी, जनावरांना व अन्य पशु प्राण्यांना पाणी मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे त्यामुळे वरील २ शहरास व लातुर जिल्ह्यात या प्रकल्पातून पाणी जाणार आसल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडेल.
सत्ताधारी व भावी आमदारांना सत्तेचा मलिदा खायला मिळाल्यावर आवाज कसा निघेल ही नायगाव तालुक्याची शोकांतिका आहे आणि याला येथील जनता जबाबदार आहे. निवडणुका आल्या की, त्या पैशावर होतात आणि ते पैसे आपण स्वतः मतदारच घेतो आणि मग उमेदवाराकडून आपण अपेक्षा कशी ठेवावी. कारण निवडणुकीला खर्च दिला पैसा ५ वर्षात त्यांना काढावा लागणार या जगात आता तुकाराम महाराज कोणी नाही स्वतःचं कर्ज लोकांना दिलेलं इंद्रायणीत कर्ज खाते बुडवणारे तुकाराम महाराज या देशात होऊन गेले. त्यांचा आदर्श चालवणारा या देशात कोणीच निर्माण झाला नाही म्हणून आवाज उठवायला आता जणताच पुढ आली पाहिजे तरच अशा प्रकारचे काम बंद पडतील नाही तर चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडी.