🔴 सुरगाणा करंजाळी आदिवासी सेना यांचा चक्काजाम आंदोलन.
सुरगाणा प्रतिनिधी :दिनेश गावित
सुरगाणा, करंजाळी बोरगाव
आज दिनांक२३/८/२०२४ रोजी आदिवासी सेना यांच्या जन आक्रोश आंदोलन गुजरात सुरगाणा हायवे करंजाळी बोरगाव ह्या चौफुली ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून १७ संवर्धन पेशा अंतर्गत भगवान बिरसा मुंडा ग्रुप हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी हजारोच्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष यांनी निदर्शने दाखवून गुजरात हवे चक्काजाम केलेला आहे सुरगाणा नगरसेवक रमेश थोरात सरकार विरुद्ध घोषणा देत आदिवासी संघटना यांना पाठिंबा दर्शवला आहे यांच्या मार्गदर्शनाखाली चालेल हा चक्काजाम विविध मागण्यासाठी करण्यात येत असून सरकारला अल्टिमेट दिले असून सुद्धा वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवून आदिवासी बांधव यांचा अवमान केला आहे दिनांक २३/८/२०२४ रोजी सरकारला निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रभर जन आंदोलन करू अशी करंजळीचे प्रतिष्ठित बिरारी सर व यशोधन देशमुख सर आंदोलन करते आदिवासी सेना महिला व पुरुष यांना एकजुटीने आपला न्याय निवाडा कसा होईल याबद्दल मार्गदर्शन देऊन आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत
आंदोलन तिसरा दिवस असून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील महिला समस्या दूर करू आंदोलक ठिकठिकाणी आदिवासी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चक्काजाम राहणारच हा त्यांचा ठाम निर्णय होय वेगवेगळ्या प्रतिनिधी संघटनेस भेट देत असून त्यांचे आंदोलन अधिकाधिक तीव्र होत आहे.