🔴 सांगली महाकारूणी तथागत गौतम बुद्ध वर्षावास सोहळा संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
सांगली आज दिनांक २२/८/२०२४ रोजी विहारांमध्ये वर्षावास निमित्ताने धम्मदेशनेचा कार्यक्रम संपन्न झाला.धूप दीप मेणबत्ती प्रज्वलित करून आपले आदर्श महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील भीमस्मरण भीमस्मृती बुद्ध पूजा बुद्ध वंदना धम्मवंदना व संघ वंदना घेण्यात आली. त्यानंतर आना पानसती ध्यानाचा सराव घेण्यात आला. विहाराचे संचालक संजय घाडगे सर यांनी जीवन जगत असताना माणसाच्या जीवना मध्ये ध्यानाचे किती अनमोल महत्त्व आहे हे समजावून सांगितले. तसेच ध्यानामुळे माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते व्यक्तीचे जीवन बदलून जाते एक आदर्श व्यक्तिमत्व बनू शकते माणूस असत्याच्या धारणेपासून अलिप्त होऊन सत्याच्या मार्गाकडे परावर्तित होतो. एवढी प्रचंड ताकद ध्यानामध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी २० मिनिटं ध्यान सराव करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी त्यांच्या धम्मदेशनेश मध्ये सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. बहुजन समाजातील मुले शिक्षणा पासून सध्या दूर चाललेलीआहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्या वर विचार विनिमय करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही एक काळाची गरज आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले शेवटी विहाराचे खजिनदार एस.आर. माने यांनी आभार मानून धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रम संपन्न झाला.