🔴 डॉ. अमोल पाटील ढगे यांच्या वाढदिवसा निमित्त उमरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम.
शिवगर्जना न्यूज,
उमरी प्रतिनिधी:- महेश पडोळे
ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचे काहीतरी देणे लागते या उदात्त अं:तकरनाने डॉ. अमोल पाटील ढगे दरवर्षी आपल्या वाढदिवसा निमित्त विविध सामजिक उपक्रम राबवत असतात. भा.ज.पा. युवा मोर्चा प्रदेश सचिव डॉ. अमोल पाटील ढगे यांचा गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसा निमित्त उमरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.२२ रोजी सकाळी ०८ वाजता उमरी येथील व्यंकटेश नगर परिसरात झाडे लावणे. ठीक ०९:३० वाजता ग्रामीण रूग्णालय उमरी येथे रुग्णांना फळ वाटप, ठीक १० वाजता तळेगाव येथील साईबाबा मंदिर सभागृहात गरजूंना छत्री वाटप, करकाळा जिल्हा परिषद शाळे मध्ये विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप, गोळेगाव जिल्हा परिषद शाळे मध्ये विद्यार्थ्यांना वही पेन वाटप, शिंगणापूर येथे गरजूंना छत्री वाटप, बिजेगाव येथे गरजूंना छत्री वाटप, यंदाळा, महाटी, कौडगाव, शाळे मध्ये विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप, बळेगाव येथे वृक्ष वाटप आणि वृक्ष लागवड.
त्यानंतर सायंकाळी ठीक 6 वाजता उमरी येथील गिरीश भाऊ देशमुख गोठेकर मंगल कार्यालय मध्ये अभिष्टचिंतन सोहळा त्यानंतर गरजू महिलांना साडी वाटप, त्यानंतर अपघातग्रस्त कुटुंबांना शिलाई मशीन ची वाटप, पत्रकारांचा सन्मान आणि त्यांना रेनकोट वाटप, त्यांच्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवार आयोजका मार्फत उपक्रम राबवत असतात.