20.2 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️म.सा.प. राजगुरुनगर शाखेची श्रावणी काव्य मैफिल संपन्न.

🔴 म.सा.प. राजगुरुनगर शाखेची श्रावणी काव्य मैफिल संपन्न. 

 

पूणे प्रतिनिधी :

जगदीप वनशिव 

राजगुरुनगर – येथील महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखेच्या वतीने श्रावणी काव्य मैफिल भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खेड तालुका सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. काव्य मैफिलीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी बबन धुमाळ, प्रमुख पाहुणे डॉ सुरेश वाकचौरे, लोक कवी सीताराम नरके, साहेबराव पवळे, कालीदास वाडकर, पुणे जिल्हा भा.ज.पा. उपाध्यक्ष संतोष गाढवे, अध्यक्ष म.सा.प. राजगुरुनगर शाखा, मधुकर गिलबिले, बाबाजी शिंदे, प्रल्हाद शिंदे, डी. के. वडगावकर या मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून उद्घाटक सोहळा संपन्न झाला. 

काव्य मैफिलीत बापू दासरी, अरूण कांबळे, दिनेश गायकवाड, देवेंद्र गावंडे, डॉ. दत्ता पायमोडे, निरंजन ठणठणकर, प्रभा वाघ, बापूराव गर्जे, मेहमूदा शेख, अशोक उघडे, बाळासाहेब मुंढे, संजय मोरे, जनाबापू पुणेकर, श्रीधर, लखन जाधव, राहुल भोसले, जितेंद्र सोनवणे, प्रशांत राजे, रामचंद्र गुरव, प्रकाश गायकवाड, विकास आतकरी, विजय चव्हाण, उमेश गोरे, शब्दस्वरा मंगळूकर अशा साठ कवींनी कविता सादरी करण केले. प्रेम पाऊस, छक्कड गझल, विरह देशप्रेम, वैचारिक अभंग, विनोद रचना, विडंबन गीत, लावणी, गवळण, मार्मिक भाष्य करत विविध तराणे नवे तंत्र जपणारे काव्य शास्त्रात श्रावणी काव्य मैफिलीची रंगत वाढली.

प्रमुख पाहुणे कालीदास वाडकर म्हणाले असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून समाजात परिवर्तन प्रबोधन घडून येते शासन दरबारी यांची नोंद घेतली जाते. यावेळी साहित्यिकांच्या मागण्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील वेळोवेळी मदत करीन अशी ग्वाही दिली. 

अध्यक्षस्थानी असलेले कवी बबन धुमाळ म्हणाले, कविता ही स्पष्ट होते कवितेतील प्रतिके अलंकार उत्तम प्रतिमा असली की रचना सुंदर होते. भावना तरलता जाणवते क्षणोक्षणी आठवण करून देत राहते ती कविता असते मनातील खदखद व्यक्त करते ती कविता वास्तववादी चित्रण मांडते अन् सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधन करणारी रचना ही काळाची गरज आहे. कवितेची दर्जेदार मांडणी केली तर कविता कुठेही कधीही सुचते. आशय विषय मतीत अर्थ बोध देते त्या कविता मुळे दिशा पाठबळ मिळतेच तर कवितामुळे उर्मी उर्जा मिळते. सकस आहार जसा आरोग्यात उपयोगी पडतो तसेच कविते चे पण आहे असा आशावाद व्यक्त केला. 

श्रावण काव्य मैफिलीचे सूत्र संचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार दमदार आवाजात शीघ्र शैलीत चारोळ्या विनोदी चुटके शेरो शायरी विनोद सांगत कार्यक्रमाची शोभा वाढविली. अशाप्रकारे राजगुरु नगर येथील चांडोली फाटा ईगल बॅक्वेट हॉल दोंदे कडूस रोड या सभागृहात संपन्न झाला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या