20.7 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️रक्षाबंधन ओवाळणी तून मिळालेल्या २२ हजार ४०० रु. शैक्षणिक साहित्य जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना देणार.

🔴 येरगी बालिका पंचायत ला ओवाळणी तून मिळालेल्या २२ हजार ४०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना देणार.

♦️रक्षाबंधन निमित्त बालिका पंचायत चा आगळा वेगळा उपक्रम.

शिवगर्जना न्यूज,
देगलूर प्रतिनिधी :(९९२३०७२२४२)

आज रक्षा बंधन निमित्त तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे बालिका पंचायत राज समितीच्या वतीने रक्षा बंधनाचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री विश्वनाथ झुंझारे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संतोष पाटील यांची उपस्थिती होती. गावातील मारोती मंदिराजवळ बालिका पंचायत द्वारा आयोजित सार्वजनिक रक्षा बंधन कार्यक्रमात गावातील बहु संख्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी येरगी गावातील बालिका पंचायत राज आणी गावातील विकास कामाची पो.नि. झुंजारे यांनी गावातील विकास कामांची प्रशंसा केली. बालिका पंचायत राज कडून घेतलेल्या दारू बंदी, हुंडा बंदी आदी महत्वाच्या निर्णयावर बोलताना म्हणाले, गावात या विरोधात कोणी वागत असेल, कोणी दारू पित असेल किंवा विकत असेल (अवैध धंद्यांना कोणी चालना देत असेल) तर त्याची गय न करता त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. दारू बंदी, गुटखा बंदी चा निर्णय अतिशय स्तुत्य असून यावर होणारा खर्च आपल्या परिवाराच्या प्रगती साठी वापरावा असे ते म्हणाले. बालिका पंचायत राज समिती च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले. सरपंच संतोष पाटील, ग्राम विकास अधिकारी राजेश तोटावाड, मुख्याध्यापक प्र.ईश्वर वाडीकर, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व शिक्षक, बालिका पंचायत राज समितीचे सरपंच अंजली वाघमारे, उप सरपंच पुनम सुर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दाणेवार, ग्रामपंचायत सदस्य शिवकांता भुरळे, रोहिणी दाणेवार, सपना काळीगवार, महादेव गादगे, महादेव गोशट्टी, श्रीदेवी धाकपाडे, रूद्राणी चैडके, आश्विनी पांचाळ, तंटामुक्त अध्यक्ष शिवाणी मठपती, पोलिस पाटील अनिता बागेवार, आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापल्या परीने ओवाळणी दिली. यातून तब्बल २२ हजार ४०० रु. जमा झाले.

बालिका पंचायत या २२ हजार ४०० रुपयांचे शैक्षणिक साहित्य खरेदी सह गावातील शाळेला देणार आहे. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल.

रक्षा बंधना निमित्त बालिका पंचायत राज समिती च्या वतीने आयोजित सार्वजनिक रक्षा बंधन कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या