🔴रक्षाबंधनाचे अवचित साधून कार्बन नाका सातपूर पदग्रहण सोहळा संपन्न.
♦️भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव
नाशिक : सातपूर आज रोजी मा. दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती च्या वतीने कार्बन नाका सातपुर या ठिकाणी रक्षाबंधन व पदग्रहण सोहळा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न रविवार दि.१८/०८/२०२४ रोजी रक्षाबंधन दिना निमित्त आज बहिण भाऊ ऋण बंधन म्हणून रक्षा बंधन समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती मंदाताई उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक व श्रीमती कमलताई इंगळे, नाशिक जिल्हा मार्गदर्शक सौ.सुनिता केदारे, नाशिक शहर उपाध्यक्ष यांनी आयोजित केला होता. मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच बरोबर पद ग्रहण करताना समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादा भाऊ केदारे व सौ.रोहिणीताई जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष व डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव यांच्या हस्ते श्री. विक्रम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख या पदावर निवड व मा.मंदा पवार उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक या पदावर निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष व डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव. सौ.रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.हेमंत कुलकर्णी मार्गदर्शक, ॲड. शिंदे, विक्रम गायकवाड ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जागो ग्राहक जागो.