30 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

♦️मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्याग्रस्त बांधवाच्या घरी रक्षा बंधन साजरा.

🔴 छावा संघटनेच्या वतीने व राष्ट्रिय मराठा महासंघाच्या वतीने मराठा आरक्षण व शेतकरी आत्महत्या केलेल्या बांधवाच्या घरी रक्षाबंधन साजरा. 

शिवगर्जना न्यूज, 

नायगांव तालुका प्रतिनिधी : परमेश्वर पा. जाधव

सामाजिक वारसा असलेली अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यातील भोपाळा गडगा केदारवडगाव टाकळी बळेगाव येथील मराठा आरक्षणासाठी व शेतकरी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या घरी जाऊन सामाजिक बांधिलकी कायम असावी ही बाब लक्ष्यात ठेऊन हा उपक्रम छावा संघटनेच्या वतीने राबवण्यात आला. यावेळी छावाचे जिल्हा अध्यक्ष माधवराव ताटे पाटील, ता. अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर, राष्ट्रीय मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील होटाळकर, परमेश्वर पाटील जाधव, निळकंठ पाटील जाधव, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष बालाजी देशमुख, साई पाटील मोकासदरेकर, सुदर्शन गाढे, केशव हंबर्डे, दिलीप हंबर्डे, शहाजी जाधव, बालाजी कुदळे, साईनाथ कदम माधव भंडरवाड, सोपान पाटील उमरेकर तसेच असंख्य छावा आणि राष्ट्रीय मराठा महासंघ कार्यकर्ते उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे नियोजन छावाचे संपर्क प्रमुख साई पाटील देगावकर यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या