
🔴 पोलीसच खरे मित्र, मैत्री दिनाचा आगळा वेगळा उपक्रम.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : शाम जाधव
नाशिक दि. ४/८/२०२४ ऑगस्ट जागतिक मैत्री दिन निमित्त श्री राधिका फाउंडेशन व महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने पोलिसां सोबत मैत्री दिवस साजरा करण्यात आला. खरा मित्र तोच असतो, जो संकट समयी धावून येतो. आम्हास कोणत्याही संकट वेळी प्रथम आठवण येते ती पोलिसांचीच मग ते लगेचच धावून येतात. सण उत्सव स्वतःच्या घरातील कार्यक्रम सोडून ते हजर असतात. म्हणजेच खऱ्या अर्थाने तेच खरे मित्र म्हणून या दिवशी आम्ही पोलिसानांच (फ्रेंडशिप बेल्ट) बांधून त्यांच्या सोबत मैत्रीदिन साजरा करत भेट म्हणून पेनाचे वाटप केले.
यावेळी कड सरांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले तर कार्यक्रमासाठी सर्व तोपरी सहकार्य लाभले.
▪️पंचवटी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक-श्री मधुकर कड ज्यांना दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आम्हा सर्वांशी चर्चा करून महत्वाच्या गोष्टी वर मार्गदर्शन केले.
पंचवटी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक- ज्योती मॅडम आमणे, पोलीस उप निरीक्षक कैलास जाधव, वर्षा पाटील तसेच पंचवटी पोलिस स्टेशन पोलिस स्टाफ यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक ही केले. कार्यक्रम यशस्वतीसाठी श्री राधिका फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. चेतना ताई सेवक, राणी कासार, विकी कुटे, महेंद्र आहिरे, दिपाली केंगे, श्री व सौ. ज्योती जोशी, रेखा काळे, स्नेहा शिंपी, उमा परदेशी,
महावीर इंटरनॅशनल :- अध्यक्ष श्री अनिल नहार, श्री राजेंद्र बाफना, सौ. संगीता बाफना, श्री किशोर बाफना, श्री जयंत एंडाईत, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ.चेतना ताई सेवक यांनी फाऊंडेशन ची माहिती दिली तर संगीता बाफना यांनी आभार मानले.















