
🔴 उमरी येथे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुका सोहळ्या निमित्त बैठक संपन्न.
शिवगर्जना न्यूज,
उमरी तालुका प्रतिनीधी : महेश पडोळे
उमरी:- जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, परम पूज्य कानिफनाथ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उमरी येथे दि.१२ डिसेबर २०२४ मध्ये होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्या निमित्त मराठवाडा सहपीठ प्रमुख तथा नांदेड जिल्हा निरीक्षक काकासाहेब वनार्से यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून, सुरुवातीस जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन नां.जि.म.बॅक संचालक श्री कैलास देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आलेल्या मान्यवरांचे कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज परम पूज्य कानिफनाथ जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उमरी येथे दि.१२ डिसेबर २०२४ मध्ये होण्याऱ्या पादुका दर्शन सोहळ्या निमित्त मराठवाडा सहपीठ प्रमुख काकासाहेब वनरसे यांच्या उपस्थितीत दि.०३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ११ वा. जगद्गुरु श्री च्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सुरुवात झाली. यात मराठवाडा उपपिठाचे प्रमुख काका साहेब वनरसे यांनी आलेल्या भक्त गणास सखोल मार्गदर्शन केले. बोलतांना पादुका दर्शन सोहळ्या निमित्त काय सेवा करावी लागते, विशेष कोण कोणते साहित्य लागतात, नियोजन कश्या पध्दतीने करावे याबद्दल सविस्तर भाविकांना समजून सांगण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. ग्राम स्वच्छता, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देह दान, रक्त दान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघात ग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केले जातात.
आपणास ही या पादुका दर्शन सोहळ्या निमित्त कोणास काय द्यायचे असेल तर… शाळेला कंप्युटर, विद्यार्थ्यांना लागणारा शैक्षणिक साहित्य वाटप करावे, सद्याला पावसाळा असून विदयार्थ्यांना छत्री वाटप करावे. पार पडणारा सोहळा पादुका दर्शन निमित्त काय करावे लागेल पुर्ण माहिती दिली. या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पादुका गुरुपुजन सोहळा, जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज श्री पादुकांचे आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती सोहळा, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे. या पादुका दर्शन सोहळ्यास संपूर्ण जिल्हा सेवा समिती, पीठ समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, गुरु सेवक, शिष्टाचार अधिकारी, प्रवचनकार, जिल्ह्यातील सर्व आजी व माजी पदाधिकारी, उपासक, साधक, शिष्य भक्तगण, हित चिंतक जिल्ह्यातील सर्व गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा पीठ व जिल्हाध्यक्ष जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात येईल जास्तीत जास्त सर्व लोकांपर्यंत सोहळ्या निमित्त निरोप पोहचला पाहीजे. तसेच राजकीय क्षेत्रातील प्रत्येक प्रशासनातील कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती असावी, शहरातील मुख्य रस्त्याने भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात यावे ४० ते ६० हजार भक्तगण उपस्थिती रहावे त्यांची सर्व सोय उपलब्ध करून घ्यावेत.
शेवटी माउली विषयी थोडक्यात अनुभव सांगीतले, कुठेही न भटकता संताच्या सानिध्यात येऊन माऊली सांगीतल्या प्रमाणे “स्वप्नात ही कोनाचे वाईट चिंतु नका, पर स्त्री माते समान…. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, गणी गण गणात बोते हा मंत्र जपा, आठवड्यात एकदा संत संगाला (माऊली भावीक एकत्रित) येने, दर गुरूवारी आरतीला या, भक्ती करा मगच माऊलीची प्रचिती घ्यावे. व्यसन मुक्ती जिवन जगावे असे ही काकासाहेब वनरसे यांनी सागीतले आहे.
यावेळी, म.पि.म.निरीक्षक सौ.माऊलीकर ताई, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता यशवंत कवळे, जिल्हाध्यक्ष किशनराव मुंडकर, साखरे ताई, उत्सव समीती अध्यक्ष यशवंत पाटील शेलगावकर तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव बोळसेकर, महिला तालुकाध्यक्षा वंदना केशव गाढे, सौ.मुंडकर ताई, युवक तालुकाध्यक्षा पल्लवी लक्ष्मण बोळसेकर, सौ. नागलवाड ताई, सुर्यवंशी सर, संभाजी पा. माऊलीकर, अशोक चरकुलवार, सिलेवाड सर, दिनेश, पत्रकार सिद्धेश्वर मठपती एडके, रॅपनवाड, सोमनाथ, चिकटवाड, साहेबराव यम्मेवार, पत्रकार उद्धव मामडे रावधानोरकर, शिवाजी बारोळे, उमाकांत कुसनुरे, पत्रकार वाघमारे, हंगीरकर, शंकर पाटील निमटेककर, मा. वनसागरे, श्री राम पुरनवाड तळेगावकर, यांच्या सह तालुका कमिटी व तालुक्यातील सर्व संत संग, आरती केंद्र प्रमुख भक्त गण बहुसंख्य उपस्थित होते.















