🔴 शालेय विद्यार्थी सुरक्षा विषयी उद्धवर्धन कार्यशाळेचे आयोजन.
शिवगर्जना न्यूज,
नाशिक प्रतिनिधी : संदीप काकड
नाशिक मखमलाबाद : आज
दि. ०१/०९/२०२४ रोजी मनपा शाळा क्र १४ व १५ मखमलाबाद या शाळेत विद्यार्थी सुरक्षा विषयक उद्बोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे सब पोलीस निरीक्षक श्री मा. अतुल कुमार डहाके यांनी मार्गदर्शन केले. म.न.पा. शाळा क्र. १४ चे मुख्याध्यापक श्री बाजीराव झाडे व मनपा शाळा क्र १५च्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री आथरे उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री डहाके साहेबांनी गुड टच, बॅड टच, सायबर सुरक्षा याबाबत विद्यार्थी सुरक्षेचे मार्गदर्शनपर धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत कशापद्धतीने प्रतिकार करायचा याबाबत ही सूचना केली.
यावेळी महिला पोलीस अंमलदार माया कामडी, माधुरी चौरे,जयश्री अलबाड, पोलीस हवालदार दीपक अरगडे, पोलीस अंमलदार योगेश पवार, तसेच दामिनी पथक प्रमुख माया गवळी मॅडम व पथकातील महिला सदस्यांनी देखील संरक्षणा बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पंकज पवार यांनी केले.
कार्य शाळेच्या समारोप प्रसंगी सर्व पोलीस अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर उद्बोधन कार्यशाळा प्रसंगी म.न.पा. शाळा क्र १४ चे श्रीमती शोभा साबळे, सौ. रोहिणी आहेर, श्री.विनायक मते, शिवाजी ठाकरे, प्रकाश बागुल, नामदेव चौरे, वृषाली आहिरे, मनीषा राणे, संगीता मौले तर म.न.पा. शाळा क्र. १५ चे श्री देविदास महाजन, श्री. हेमंत पाटील, संगीता पाटील, किसन ठाकरे, कल्पना, प्रतिभा वाटपाडे, सुरेखा कदम, अर्चना तिटकारे, राहुल चौधरी, प्रकाश बहिरम इ. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.