🔴 पिडीत महिलेला न्याय द्या नाही तर स्वईच्छा मरण्याची परवानगीसाठी धरने आंदोलनाचा दिला इशारा.
शिवगर्जना न्यूज,
नांदेड प्रतिनिधी : चंपतरा डाकोरे
गुंटूर ता. कंधार येथील दहा वर्षा पुर्वी लग्न झालेल्या माझ्या मुलीला हिंदू रिती रिवाजाने लग्न झालेल्या मुलीला सहा वर्ष सासरच्यांनी चांगले चालत असता मुलीला मुलगा झाल्यानंतर सासरच्यांनी मुलीला भाऊ नसल्यामुळे तुझ्या वडीलांची शेती, संपती, आन मी माझ्या बहिणीला शेती दिली तुला तर भाऊ नाही म्हणून सासरच्या व्यक्ती ने कौटुंबिक छळ चालु केल्या नंतर अनेक वेळा पंचा समक्ष समजुन सांगत त्रास सहन करत असता सासरच्यांनी शेती विकु लागले असता मी माझ्या मुलीचा व नातवाचा विचार करून मुलीच्या सासर च्या व्यक्तीने माझ्या मुलीच्या संमती विना संपती विक्री, गहाण करु नये त्यास पायबंध घालावा म्हणून दि.२४ नोंव्हे.२०२० रोजी तहसीलदार कंधार, दुय्यम निबंधक कंधार यांना निवेदन देऊन त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही.
१२ नोंव्हे.२०२२ रोजी मला त्रास दिल्यामुळे मुलीला घेऊन कंधार पोलिस ठाण्यात निवेदन देऊन त्यांनी सुध्दा दखल घेतली नाही. मुलगी माझ्या सोबत माहेरी राहात असतांना कौटुंबिक हिंसाचार अधिनियम २००५ प्रमाणे १८ मार्च २०२३ अंतर्गत न्यायलयात प्रकरण चालु असताना सासरच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेली जमीन विक्री गहाण करू नये म्हणून दिवानी न्यायालय कंधार येथील दि.दा.क्र.७०/२०२४ न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेली संपती विक्रि करू नये म्हणुन न्यायालयाची साक्षांकित प्रत व निवेदन दिल्यानंतर पती, सासू, पतीचा भाऊ यांनी कोरडवाहु असलेली जमीन विहिरीवर ओलिताची हळद लागवड दाखवून विक्री केली त्यांची चौकशी करुन फेर न घेऊ नये विहिरी ची व पिक लागवडीची चौकशी करून योग्य ते कार्यवाही करणे बाबत शासन, प्रशासनास बत्तीस निवेदन देऊन साधे ऊतर किंव्हा चोकशी होत नसल्यामुळे दोन वेळा स्वईच्छा मरण्याची परवानगी मागितली तरी न्याय मिळाला नसल्या तहसिलदार, उप विभागीय अधिकारी कंधार, जिल्हाधिकारी नांदेड, दुय्यम निबंधक कंधार, लोकशाही दिन जिल्हाधिकारी नांदेड, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री महोदय, मंडल अधिकारी, तलाठी, इत्यादी ना
२०२२ पासुन ते आजपर्यंत प्रशासनास बत्तीस निवेदन देऊन त्यांची साधी चौकशी का झाली नाही. खोटा पेरा देणाऱ्यांवर शेती विक्रि, व खरेदी, करणाऱ्याना पावबंध न घातल्यामुळे सासरच्या कुटुंबातील व्यक्ती सासरा, सासु, पती, पतीच्या भावाच्या नावाने असलेली जमीन चार वेळा विक्री माझ्या मुलीच्या परस्पर प्रशासनाच्या सहकार्याने विक्री खोटी माहिती ची चौकशी अठरा महिन्याला चौकशी साठि नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी करण्यासाठी गेले असता अठरा महीन्याला विहिरी वरची हाळद दिसेल काय?
रजिस्ट्री झाल्यानंतर तिन दिवसांनी रजिस्ट्री ४६९/२४ चार फेर घेऊ नये आक्षेपाच्या अर्ज तलाठ्यांनी आक्षेप न घेता फेर का घेतला यात तलाठी यांची चौकशी का होत नाही २०२० पासुन या महिलेच्या निवेदनाची दखल कंधार तहसील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कौटुंबिक महिला व चार वर्षाच्या मुलास न्याय द्यावा नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत दिव्यांचा, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड च्या वतीने दि.१० सप्टेंबर २०२४ पासुन अनेक प्रकारच्या धरने आंदोलनात बसण्याचे निवेदन पिडित महिला व तिच्या वडीलांनी प्रशासनास लेखी निवेदन दिले.